Judges 12

1तेव्हा एफ्राइमी माणसे एकत्र मिळून आणि उत्तरेस जाऊन इफ्ताहाला म्हणाली, तू आम्हास बोलावल्याशिवाय अम्मोनी विरूद्ध लढावयाला का पलिकडे गेलास? आम्ही तुझ्यासह घराला आग लावून जाळून टाकू. 2तेव्हा इफ्ताह त्यास म्हणाला, अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हास बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही.

3तेव्हा तुम्ही सोडवत नाही, हे पाहून मी माझा जीव धोक्यात घालून माझ्या स्वत:च्या सामर्थ्याने अम्मोनी लोकांविरूद्ध लढावयाला पलिकडे गेलो, याप्रकारे परमेश्वराने मला विजय दिला; तर आजच्या दिवशी तुम्ही लढावयाला मजवर का चढून आला? 4तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी माणसानी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.

5तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतारे रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळतांना बोलला, तुम्ही मला पार जाऊ द्या, तेव्हा गिलादी माणसे त्यास बोलत असत, तू एफ्राथी आहेस की काय? आणि तो नाही जर बोलला, 6तर ते त्याला म्हणत, आता तू शिब्बोलेथ असे म्हण; मग तो सिब्बोलेथ असे म्हणत (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता) मग ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळेस एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.

7इफ्ताहाने सहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला; मग इफ्ताह गिलादी मेला, आणि गिलादातल्या एका नगरात त्याला पुरण्यात आले.

8मग त्याच्यामागे बेथलेहेमातल्या इब्सानाने इस्राएलाचा न्याय केला. 9तेव्हा त्याला तीस पुत्र व तीस कन्या होत्या; त्या त्याने बाहेर दिल्या आणि आपल्या पुत्रांसाठी बाहेरून तीस कन्या आणल्या; त्याने सात वर्षे इस्राएलाचा न्याय केला.

10नंतर इब्सान मेला, आणि बेथलेहेमात पुरण्यात आले. 11आणि त्याच्यामागे जबुलूनी एलोन इस्राएलाचा न्यायधीश झाला; त्याने तर दहा वर्षे इस्राएलाचा न्याय केला. 12नंतर तो जबुलूनी एलोन मेला, आणि त्याला जबुलून देशातल्या अयालोन येथे पुरण्यात आले.

13आणि त्यानंतर हिल्लेलाचा पुत्र अब्दोन जो पिराथोनी, तो इस्राएलाचा न्यायाधीश झाला. 14आणि त्याला चाळीस पुत्र व तीस नातू होते; ते सत्तर गाढवांवर बसत असत; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला. मग तो पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्याला एफ्राइम प्रांतांतील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले.

15

Copyright information for MarULB